फलटण चौफेर दि १३ ऑगस्ट २०२५
फलटण तालुक्यातील भाविकांच्या सोयीसाठी फलटण ते संत सदगुरु बाळूमामा मंदिर, आदमापूर येथे बससेवा सुरू करण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन विभागाकडे निवेदनाद्वारे केली.फलटण परिवहन महामंडळ आगार येथे काल राष्ट्रीय समाज पक्ष सातारा जिल्हा उपाध्यक्ष संतोष ठोंबरे, कोरेगाव विधानसभा अध्यक्ष रमेश चव्हाण, फलटण तालुका अध्यक्ष महादेव कुलाळ, ज्येष्ठ नेते माणिक मामा लोखंडे, युवा अध्यक्ष निलेश लांडगे, उपाध्यक्ष रामदास केंगार, सचिव नितीन सुळ, अक्षय चोपडे, तरडगाव जिल्हा परिषद गटप्रमुख वैभव राज नरुटे, तसेच कार्यकर्ते रमेश जाधव, सुनील दडस, प्रवीण भंडलकर, प्रविण काकडे, वैभव अहीवळे, रत्नाकर क्षीरसागर, तानाजी बरकडे, दत्तात्रय ननवरे, विजय ननवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
भाविक मोठ्या संख्येने बाळूमामा दर्शनासाठी आदमापूरला जात असतात. यामध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणीय असल्याने त्यांच्या प्रवासातील गैरसोयी टाळण्यासाठी ही बससेवा आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. फलटण आगारातून नवीन मार्ग तयार करून बारामती, माळशिरस, माण तालुक्यातील भाविकांनाही या बससेवेचा लाभ मिळावा, अशीही मागणी करण्यात आली.