फलटण चौफेर दि ५ ऑगस्ट २०२५
ग्रामीण जागरुकता कृषि कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२५-२६ कार्यक्रमांतर्गत फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषि महाविद्यालय फलटण येथील कृषिकन्यांनी पाहुणेवाडी येथील सोयाबीन प्लॉट ला भेट देऊन सोयाबीन बीज उत्पन्नाबद्दल माहिती घेतली.
यावेळी बीज उत्पादक अण्णा चोरमले उपस्थित होते. त्यांनी फौंडेशन सीड पासून उत्तम प्रतीचे बीज उत्पादन कसे घेतले जाऊ शेकते याबद्दल कृषिकन्यांना माहिती दिली. उत्पन्नासाठी केलेल्या सोयाबीन पेक्षा सोयाबीन चे बीज उत्पादन शेतकऱ्यांसाठी आर्थिक दृष्ट्या वरदान ठरत आहे. सोयाबीन पेक्षा सोयाबीन बीज याला बाजार भाव तीनपटीने जास्त असल्याने शेतकऱ्याचा फायदा होतो.कृषि महाविद्यालय फलटण चे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर,कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे व प्रा. नितिशा पंडित व विषय मार्गदर्शक प्रा. विक्रम साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या नाळे पायल,शिंदे आविष्का,दांगट सेजल,कुदळे प्रचिती,चांदगुडे वैष्णवी,महानवर अश्विनी,कोडापे निधी यांनी हा उपक्रम पार पाडला.