फलटण चौफेर दि २ ऑगस्ट २०२५
"ऊसासारख्या पारंपरिक नगदी पिकांना पर्याय शोधण्याची गरज आहे. हमीभाव मिळवणाऱ्या, कमी कालावधीत उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळा," असा सल्ला विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.श्रीरामराजे यांनी स्वतःचा मोबाईल स्टेटस ठेवून शेतकऱ्यांना आवाहन करत सांगितले की, सध्या अनेक शेतकरी ऊसाचे पीक घेत आहेत. मात्र त्यातून पैसे मिळण्यासाठी दीड वर्ष वाट पाहावी लागते. त्याऐवजी केवळ तीन महिन्यांत हमीभावासह उत्पन्न देणाऱ्या नेपिअर गवत सारख्या पिकांकडे वळल्यास शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळू शकते.
या संदर्भात मार्गदर्शनासाठी आज दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता श्री सुधीर व संजय बबनराव चिटणीस यांच्या अलगुडेवाडी (फलटण) येथील शेतावरविशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि नवे पर्याय समजून घेऊन आपले उत्पादन खर्च आणि आर्थिक धोरण यामध्ये बदल करावा, असेही रामराजेंनी नमूद केले आहे.