फलटण चौफेर दि २६ ऑगस्ट २०२५
निरा खोऱ्यातील भाटघर, निरादेवघर, वीर व गुंजवणी या चारही प्रमुख धरणांमध्ये आज सकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ४७.९९ TMC (९९.२७ टक्के) पाणी साठा असून, गेल्या वर्षी याच दिवशी तो ४८.१९ TMC (९९.२७ टक्के) इतका होता.भाटघर धरणात काल ८ मि.मी. पाऊस नोंदवून पाणीसाठा २३.५० TMC (१००%) झाला आहे. धरणातून ५२९ क्यूसेक्स पाणी येत असून वीजगृहातून १६१४ क्यूसेक्स आणि विसर्ग मार्गाने ४९०० क्यूसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.
निरा देवघर धरणात २३ मि.मी. पावसामुळे साठा ११.५५ TMC (९८.५०%) झाला आहे. येथून २१९ क्यूसेक्स पाणी येत असून एकूण २३३५ क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे.वीर धरणात पाऊस झाला नाही. धरणाचा साठा ९.३४ TMC (९९.२७%) असून १५१२ क्यूसेक्स पाणी येत आहे. येथून सध्या २५,११५ क्यूसेक्स पाणी सोडण्यात येत असून त्यापैकी निरा डावा ६०० व उजव्या कालव्यातून ५५० क्यूसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.गुंजवणी धरण परिसरात ३५ मि.मी. पाऊस झाला असून साठा ३.५७ TMC (९६.९८%) आहे. १०८ क्यूसेक्स पाणी येत असून वीजगृहातून २५०, वेस्ट वेअरमधून ७३३ असे एकूण ९८३ क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे.चारही धरणांमध्ये मिळून कालपासून २.३६ TMC इतका पाण्याचा ओघ आला आहे.