अष्टपैलू व्यक्तिमत्व सुधीर कांताराम भोसले.. होळ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे मा. चेअरमन सुधीर कांताराम भोसले यांचा आज वाढदिवस त्यांच्या कार्याचा वाढदिवसानिमित्त घेतलेला थोडक्यात आढावा.... साखरवाडी पिंपळवाडी व पंचक्रोशीतील लढवय्या व्यक्तिमत्व म्हणून त्यांचे नाव निघते ते सुधीर कांताराम भोसले लहानपणापासून त्यांना सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली ७ ऑगस्ट रोजी त्यांचा नेहमीप्रमाणे वाढदिवस दरवर्षी येत असतो कायद्याचे ज्ञान असणारे सुधीर भोसले हे नेहमीच भोसले घराण्यात अग्रेसर राहिले आहेत वडील कांताराम खंडेराव भोसले यांच्या संस्कारातून पुढे आलेले हे व्यक्तिमत्व त्यांनी बीए एम एस डब्ल्यू डी एल एल डब्ल्यू अशी सामाजिक पदवी मिळवली त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यात झोकून दिले पिंपळवाडी साखरवाडी गावातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी २००७ साली चॉकलेट फॅक्टरी मध्ये डॉक्टर रायटर्स स्वाभिमानी कामगार संघटना स्थापन करून कामगारांना न्याय हक्कासाठी या संघटनेच्या माध्यमातून भूमिका बजावली आजही या कामगारांच्या लढ्यासाठी ते लढत आहेत आणि लढा चालू ठेवला आहे गावच्या तंटामुक्ती अभियानात सुद्धा त्यांनी मोठा सहभाग नोंदवला होता गावातील शिव स्वराज संघ स्थापन करण्यात ते पुढे होते २००९ साली होळ सोसायटीच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये ते निवडणूक जिंकून आले आणि त्याच वेळी सुधीर भोसले यांना सहकार क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली सहकाराच्या संपूर्ण अभ्यासासाठी ते तत्पर राहिले त्यानंतर त्यांची पुन्हा २०१६ साली बिनविरोध याच ठिकाणी निवड होऊन ते होळ विकास सोसायटीच्या व्हा.चेअरमन पदावर विराजमान झाले त्यानंतर २०२१ मध्ये पुन्हा संचालक पदावर निवडून आले त्यांनी संपूर्ण राजे गटाचा पॅनल निवडून आणण्यात मोठा सहभाग नोंदवला होता त्यानंतर २०२४ मध्ये सोसायटीच्या चेअरमन पदाच्या खुर्चीचा बहुमान त्यांना मिळाल्यानंतर संस्था ऊर्जीत अवस्था आणण्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांनी आपला सहभाग नोंदवला सहकाराचा अभ्यास आणि कायद्याचे ज्ञान यामुळे सहकार क्षेत्रात त्यांना काम करताना कुठलीही अडचण येत नसत यावेळी त्यांनी विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर व श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर यांच्याबरोबर व येथील स्थानिक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना काम करण्याची संधी मिळाली होळ सोसायटीचे संचालक सभासद मित्र वर्ग ग्रामस्थ हे सुधीर भोसले यांच्याबरोबर नेहमीच राहिले यावेळी त्यांनी सोसायटीत नेत्र दीपक असे काम करून दाखवले ५१ लाख ५१ हजार असा जवळजवळ दुप्पट नफा मिळवला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही सोसायटीच्या उत्कृष्ट कामकाजामुळे एआयच्या माध्यमातून ऊस वाढीचे तंत्रज्ञान सोसायटीच्या प्रयत्नातून साखरवाडी होळ पंचक्रोशी येण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे संस्थेने उत्कृष्ट काम केल्यामुळे फलटण तालुक्यात केंद्राच्या डीसी सॉफ्टवेअर मध्ये निवड झाली व पुढे जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्प राबवणारी पहिली सोसायटी असा बहुमान होळ सोसायटीला सुधीर भोसले यांनी मिळवून दिला असे हे सुधीर भोसले यांची साखरवाडी कारखाना ज्यावेळी बंद पडला होता त्यावेळी त्यांना श्रीमंत रामराजे कृती समितीच्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली कारखाना श्रीमंत रामराजे यांच्या प्रयत्नातून चालू ही झाला सर्वांना बरोबर घेऊन जाणारे असे हे सुधीर भोसले यांचे व्यक्तिमत्व सहकार औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे विश्वासू व प्रामाणिक कुटुंब म्हणून सुधीर भोसले यांच्या घराण्याकडे पाहिले जाते सुधीर भोसले हे एक उत्कृष्ट शेतकरी असून आपल्या शेतामध्ये टोमॅटो ऊस डाळिंब अशा पिकांचे भरघोस उत्पन्न घेणारे पंचक्रोशीतील शेतकरी म्हणून त्यांचे ख्याती आहे सुधीर भोसले यांना भावी काळात चांगल्या संधी मिळाव्यात अशीही लोकांची अपेक्षा नेहमीच असते लोकांची सेवा व न्याय मिळवण्या करीता तसेच विकास कामांना गती देण्यासाठी सुधीर भोसले यांना पुन्हा चांगल्या ठिकाणी योग्य वेळी योग्य संधी मिळावी अशी अपेक्षा करून त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
पत्रकार -किसन भोसले साखरवाडी