फलटण चौफेर दि ७ ऑगस्ट २०२५ मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दीर्घकाळ लढा देणारे आणि मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांचा उद्या (८ ऑगस्ट) रोजी फलटण दौरा होणार आहे. हा दौरा २९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या भव्य मराठा मोर्चाच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आला आहे
फलटण येथे होणाऱ्या या दौऱ्यात सजाई मंगल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत पुणे, सातारा,सांगली सोलापूर जिल्ह्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. बैठकीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने नियोजन करण्यात आले असून, या बैठकीत आगामी मुंबई मोर्चाची दिशा, आयोजन, संयोजन आणि पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरवली जाणार आहे. २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ऐतिहासिक मोर्चासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणारी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असून, मराठा समाजाच्या एकजुटीचा निर्धार पुन्हा एकदा दिसून येणार आहे.