फलटण चौफेर दि ६ ऑगस्ट २०२५
फलटण शहरातील गिरवी नाका परिसरात एका इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरु आहे. यासंदर्भातील अधिकृत माहिती कारवाई पूर्ण झाल्यानंतर प्रसिद्धीस दिली जाणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.दरम्यान, संबंधित इसमाकडून शस्त्राचा वापर करून गोळीबार करण्यात आल्याची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू असली तरी, पोलिसांनी याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. फलटण शहर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी सांगितले की, "त्या इसमाकडील शस्त्रातून गोळीबार झाल्याचा कोणताही पुष्टीदायक पुरावा अथवा साक्षीदार अद्यापपर्यंत आढळून आलेले नाहीत."
या कारवाईबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून, यापुढील तपशील अधिकृत वृत्तामधून लवकरच देण्यात येणार असल्याचेही शहा यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची प्रतीक्षा करावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.