सातारा दि २९ जुलै २०२५ – स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी पोलिस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई करत तब्बल २३ गंभीर गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत ५२ तोळे सोनं, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व शस्त्र असा सुमारे ५२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेली अधिक माहिती अशी, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित सचिन यंत्र्या भोसले (रा. फडतरवाडी, ता. सातारा) व त्याचे साथीदार सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी दरोडे, चेन स्नॅचिंग, जबरी चोरी, घरफोड्या अशा प्रकारचे गुन्हे करत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पथकाने सापळा रचत दिनांक ७ जुलै २०२५ रोजी जिहे गावात संशयितांचा पाठलाग करून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चौकशी केली असता त्यांनी एकूण ३० गुन्ह्यांची कबुली दिली आहे.तपासादरम्यान संशयित सचिन यंत्र्या भोसले (वय ३०, रा. फडतरवाडी, ता. सातारा),नदीम धर्मेंद्र काळे (वय २२, रा. तुजारपूर, ता. वाळवा, जि. सांगली)आशिष चंदुलाल गांधी (वय ३९, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा) – सराफ दुकानदारसंतोष जगन्नाथ घाडगे (वय ४८, रा. देगाव, ता. सातारा) – सराफ दुकानदार
या गुन्ह्यांमध्ये संशयितांनी चोरलेले सोने विविध ठिकाणच्या सराफ दुकानदारांना विकल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासात संबंधित सराफांनी तपासात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची माहितीही समोर आली आहे.या कारवाईमध्ये मसूर, उंब्रज, फलटण शहर, कराड, मल्हारपेठ, लोणद, खंडाळा, सातारा तालुका, वडुज अशा विविध पोलिस ठाण्यांतील ३० पेक्षा अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आलं आहे.
या यशस्वी कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी – विश्वास शिंगाडे, रोहित फाणे, परितोष दातीर, संजय शिर्के, मंगेश महाडिक, अमोल माने, जयवंत खांडके, शिवाजी भिसे आदींचे विशेष योगदान राहिले आहे.या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर अधीक्षक डॉ. विशेष कडुकर यांनी संबंधित पथकाचे अभिनंदन केले