फलटण चौफेरदि. २९ जुलै २०२५ — होळ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन आणि व्हा. चेअरमन पदाच्या रिक्त जागांसाठी नुकत्याच झालेल्या निवडीत राजेंद्र एकनाथ भोसले यांची चेअरमन आणि विजयाताई लक्ष्मण भोसले यांची व्हा. चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड सोसायटीच्या सभागृहात निवडणूक अधिकारी योगेश लांडे आणि सचिव राजकुमार अनपट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या निवडीप्रसंगी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन नितीन शाहूराजे भोसले, होळ सोसायटीचे माजी चेअरमन निवृत्ती सर्जेराव भोसले, मा. चेअरमन चंद्रकांत भिमराव भोसले, हनुमंत भिमराव भोसले, सुधीर कांताराम भोसले, तसेच कामगार पतपेढीचे माजी चेअरमन विलासराव भोसले, अभयसिंह निंबाळकर, युवराज साहेबराव भोसले, सर्व संचालक, स्वीकृत संचालक, हितचिंतक, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच ढगाई देवी पाणी वाटप सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव भोसले, गावचे प्रतिनिधी दिलावर मेटकरी, तानाजी भोसले, विलास भोसले, महादेव भोसले, दुर्योधन भोसले, ओंकार भोसले, भगवान गाडवे, दासाराम भोसले यांचाही सक्रिय सहभाग लाभला.या निवडीबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी नवीन कार्यकारिणीचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.