Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चायना मांजाने युवकाची मान चिरली; १८ टाके; संतप्त नागरिकांतून पोलिसांवर नाराजी

 




फलटण चौफेर दिनांक २९ जुलै २०२५

फलटण शहरातील नायरा पेट्रोल पंपाच्या समोर मोटरसायकलवरून जात असलेल्या पांडुरंग कुंभार यांच्या मानेला चायना मांजा लागून ती खोलवर कापली गेली. या धक्कादायक प्रकारात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तात्काळ स्वामी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. सर्जन डॉ. रवींद्र बिचकुले यांनी त्यांच्या मानेला १८ टाके टाकले असल्याची माहिती देण्यात आली आहे.चायना मांजाच्या वाढत्या वापरामुळे दरवर्षी अशा प्रकारच्या जीवघेण्या घटना घडत असताना देखील प्रशासन यावर ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.



चायना मांजा विक्री व वापर कायद्याने गुन्हा असूनही त्याचा सध्या खुलेआम वापर सुरू आहे. यावर बंदी असूनही विक्री थांबलेली नाही. पोलीस भरारी पथक केवळ कागदोपत्री सक्रिय असल्याचे स्पष्ट चित्र नागरिकांच्या रोषातून उमटत आहे.सामान्य नागरिक, दुचाकीस्वार व पक्षांच्या जीवाला धोका निर्माण करणारा हा मांजा पूर्णतः बंद व्हावा, अशी मागणी सर्वसामान्यांमधून जोर धरत आहे.



पक्षीप्रेमी, पर्यावरणप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत याबाबत ठोस मोहीम राबवावी, अशीही मागणी होत आहे. पतंग उडवण्याचा आनंद घ्या, पण कृपया चायना मांजाचा वापर करू नका, असे आवाहन फलटणमधील सुजाण नागरिकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.