Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात फलटण आगाराचा उत्स्फूर्त सहभाग

 



साखरवाडी(किसन भोसले)हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान हे शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यातील एसटी बसस्थानकांवर राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ राज्याचे परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांनी मुंबई कुर्ला येथून केला.



यामध्ये बसस्थानक ही आपलीच घरे समजून ती स्वच्छ, सुंदर, सुव्यवस्थित ठेवण्याचे आवाहन एसटी कर्मचाऱ्यांना करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील फलटण आगार अंतर्गत येणाऱ्या साखरवाडी बसस्थानकाची पाहणी मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षामार्फत करण्यात आली.या पाहणी प्रसंगी कक्ष अधिकारी अभिजीत पाटील, विभाग नियंत्रक स्वप्नील साहेब, प्रवासी संघ फलटण तालुका अध्यक्ष शिवलाल गावडे, प्रवासी महासंघ सातारा सचिव सोमनाथ मागाडे, तसेच पत्रकार किसन भोसले यांच्या समितीने बसस्थानकाचा अहवाल तपासून त्यास गुणांकन दिले.यावेळी साखरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले, उपसरपंच विक्रम ढेंबरे, बाळासाहेब भोसले, सामाजिक कार्यकर्ते दिलीप बाबा पवार, फलटण तालुका ग्राहक मंचाचे उपाध्यक्ष विशाल नाळे, फलटण आगार व्यवस्थापक राहुल वाघमोडे, बसस्थानक प्रमुख सुहास कोरडे साहेब, तसेच साखरवाडी बसस्थानक कर्मचारी काकडे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हा उपक्रम ग्रामस्तरावर स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणारा ठरत असून, नागरिक आणि प्रशासन यांच्या सहभागातून साखरवाडी बसस्थानक अधिक स्वच्छ व आकर्षक बनवण्याकडे वाटचाल करत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.