फलटण चौफेर दि २९ जुलै २०२५
बंदी असलेला चायनीज मांजा वापरणाऱ्या अति उत्साही मुलांवर साखरवाडी पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करत चायनीज मांजा ताब्यात घेतला आहे. सरदार वल्लभभाई पटेल,साखरवाडी विद्यालय परिसरात व पिंपळवाडी येथे काही मुलांकडून चोरून चायनीज मांजा वापरण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, संबंधित मुलं मांज्यासह पळून जाण्यात यशस्वी झाली. मात्र पोलिसांनी घटनास्थळावरून चायनीज मांज्याचे गुंडाळी व साहित्य जप्त केले आहे.ही कारवाई साखरवाडी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार महादेव मारुती पिसे आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल हनुमंत देशमुख यांनी केलीचायनीज मांजामुळे अनेक जीवितहानीच्या घटना घडत असल्याने पोलिसांकडून सतत जनजागृती व कारवाई केली जात आहे. नागरिकांनी अशा घातक मांज्याचा वापर टाळावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.