Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण तालुक्यात आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन



फलटण चौफेर दि १ ऑगस्ट २०२५

महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरता १ ऑगस्ट महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने दि. १ ते ७ ऑगस्ट कालावधीत फलटण उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहात विशेष मोहिम, कार्यक्रम, उपक्रम, शिबिरे व महसूल अदालतींचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांचा तालुक्यातीलनागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजीत जाधव यांनी केले आहे.



सप्ताहात दि.१ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभ, दि. २ ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करणे. दि. ३ रोजी पाणंद शिव रस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे. दि. ४ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबवणे. दि. ५ ऑगस्ट रोजी विशेष



सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप करणे. दि. ६ रोजी शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार निर्णय घेणे. दि. ७ रोजी एम सँड धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेले जाणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.