फलटण चौफेर दि ३१ जुलै २०२५
फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांची बदली करण्यात आली असून त्यांना नवी मुंबई येथे सहायक पोलिस आयुक्त (ACP) पदावर बढती मिळाली आहे. त्यांच्या जागी आता अंबड, जि. जालना येथे कार्यरत असलेले विशाल खांबे यांची फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राहुल धस यांनी फलटण उपविभागात कार्यरत असताना गुन्हेगारी नियंत्रण, शांतता व्यवस्था राखणे तसेच विविध सामाजिक उपक्रमांतून जनतेचा विश्वास संपादन केला होता. त्यांच्या कारकिर्दीतील धाडसी कारवायांमुळे आणि कार्यतत्परतेमुळे ते परिसरात लोकप्रिय ठरले होते.
नवीन नियुक्त अधिकारी विशाल खांबे हे अंबड येथे कार्यरत होते. त्यांनी देखील अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्यकाळात अंबड विभागात कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोठे योगदान राहिले आहे.नवीन अधिकारी विशाल खांबे यांच्याकडून देखील फलटणमध्ये प्रभावी कामकाजाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.