फलटण चौफेरदि. २९ जुलै २०२५
आज सकाळी ८.३० वाजता वीर धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमानात घट झाल्याने, धरणातून नीरा नदीच्या पात्रात सुरू असलेला विसर्ग 8602 क्यूसेक्सने कमी करण्यात आला आहे.या आधी नीरा नदीच्या पात्रात 31207 क्यूसेक्स विसर्ग सुरू होता. विसर्ग कमी केल्यानंतर आता एकूण 22605 क्यूसेक्स इतका विसर्ग सुरू राहणार आहे.
निरा नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांनी खबरदारी घ्यावी व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता, निरा उजवा कालवा विभाग, फलटण यांनी केले आहे.