Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण ग्रामीण पोलिसांची कारवाई : तडीपार गुन्हेगार हद्दीत सापडल्याने अटकेत



फलटण चौफेर, दि. ३१ जुलै २०२५ 

पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात “कोंबिंग ऑपरेशन” राबविण्यात आले. या मोहिमेअंतर्गत फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत तडीपार गुन्हेगारांनी पुन्हा गावात अनधिकृतपणे प्रवेश केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.फलटण तालुक्यातील सरडे गावात ३० जुलैच्या पहाटे दरम्यान पोलीस पथकाने तपासणी केली असता, तडीपार आदेशाचे उल्लंघन करून गावात वावरत असलेले चार संशयित व्यक्ती आढळून आले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. 


रोहित भिमराव जाधव (वय ३२),ऋतिक दत्तात्रय जाधव (वय २३),विशाल बाळासो जाधव (वय २३),सुरज शिवाजी बोडरे (वय २७)(सर्व रा. सरडे, ता. फलटण, जि. सातारा)चौघांनाही फेब्रुवारी २०२५ मध्ये दोन वर्षांसाठी सातारा व पुणे जिल्ह्याबाहेर तडीपार करण्यात आले होते. मात्र त्यांनी आदेशाचे उल्लंघन करत गावात वास्तव्य केल्याने महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे.


ही कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पो.निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाईत डी.बी. पथकाचे पो.उपनिरीक्षक जी. बी. बदने, पो.हवा. नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, पो.कॉ. हनुमंत दडस व मपोकॉ. अरुंधती कर्णे यांनी सहभाग घेतला.पुढील तपास पो.हवा. अमोल जगदाळे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.