फलटण चौफेर दि २८ जुलै २०२५
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील उद्यानकन्यांनी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत गिरवी येथे शुक्रवार दि.२६ रोजी पशु आरोग्य तपासणी आयोजित केली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जाधव,तसेच अध्यक्ष सरपंच सौ.वैशालीताई कदम उपस्थित होत्या.
त्यानंतर डॉ.महेश जाधव यांनी लम्पी रोगाचा प्रादुर्भाव, त्याचा होणारा प्रसार, तसेच या रोगाचे लसीकरणाबद्दल ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी गोठ्याचे नितुकीकरण कसे करायचे याबद्दल माहिती दिली.या उपक्रमासाठी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जाधव, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु.डी.चव्हाण, कार्यक्रम अधिकारी डॉ.ए.आर.पाटील, प्रा. जे. व्ही.लेंभे समन्वयक प्रा.ए.डी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानकन्या तेजस्विनी कोकाटे, तनिष्का दौंडकर, समीक्षा लावंड, श्रद्धा शिर्के, स्नेहल क्षीरसागर, संध्या सुळ यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.