Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नीरा खोऱ्यातील पाऊस व धरणांमधील आजचा पाणीसाठा



फलटण चौफेर दि: १४ जून २०२५


नीरा खोऱ्यातील प्रमुख धरणांच्या जलसाठ्यात गेल्या २४ तासांत झालेल्या पावसामुळे थोडीफार वाढ झाली आहे. आज सकाळी ६ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार, चार प्रमुख धरणांमध्ये मिळून सध्या एकूण 8.021 टीएमसी (16.60%) पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा फक्त 4.635 टीएमसी (9.59%) इतकाच होता. यावर्षी साठ्यात समाधानकारक वाढ दिसून येते आहे.



प्रमुख धरणांची स्थिती पुढीलप्रमाणे :

भाटघर धरण:

आज 6 मिमी पावसाची नोंद झाली असून, एकूण 82 मिमी पाऊस झाला आहे. सध्या धरणात 1.756 टीएमसी (7.47%) पाणी साठवले आहे. नव्या पाण्याची आवक नाही.


नीरा देवघर धरण:

येथे 11 मिमी पाऊस पडला असून, एकूण 72 मिमी पावसाची नोंद आहे. सध्या धरणात 1.154 टीएमसी (9.83%) पाणीसाठा आहे. नव्या पाण्याची आवक नाही.


वीर धरण:

आज सर्वाधिक 25 मिमी पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत 84 मिमी पाऊस झाला आहे. सध्या 4.250 टीएमसी (45.18%) पाणीसाठा आहे. आज 80 क्युसेस नवीन पाण्याची आवक नोंदली आहे.


गुंजवणी धरण:

येथे 26 मिमी पावसाची नोंद असून, एकूण 114 मिमी पाऊस झाला आहे. सध्या 0.860 टीएमसी (23.30%) पाणीसाठा आहे. आज 7 क्युसेस नवीन पाण्याची आवक आहे.



एकूण चारही धरणांची मिळून नव्या पाण्याची एकूण आवक : 0.087 टीएमसी नीरा डाव्या कालवा  व उजवा कालवा मधून विसर्ग बंद आहे निरा खोऱ्यात पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे आगामी दिवसात जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.