फलटण चौफेर दि १७ जून २०२५ : पालखी सोहळ्यानिमित्त महावितरणकडून अत्यावश्यक लाईन मेंटेनन्सची कामे करण्यात येणार असून त्यामुळे मंगळवार, १७ जून २०२५ रोजी फलटण शहरातील काही भागांचा वीजपुरवठा नियोजित वेळेत बंद राहणार आहे.
महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, २२ केव्ही फलटण शहर फिडरचा वीजपुरवठा सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच, २२ केव्ही वायसी फिडर सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहील. २२ केव्ही म्युनिसिपल फिडरचा वीजपुरवठा सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत खंडित राहणार आहे.
तांत्रिक कामे नियोजित वेळेपूर्वी पूर्ण झाल्यास वीजपुरवठा लवकर सुरू करण्यात येईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.