Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कृषीकन्यांनी केले फडतरवाडी येथे इयत्ता १लीतील बालमित्रांचे स्वागत

 


फलटण चौफेर दि १७ जून २०२५

फडतरवाडी ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालयातील सातव्या सत्रातील कृषीकन्यांनी केले बालमित्रांचे स्वागत . दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील सर्व केंद्रातील प्राथमिक शाळा सुरू झाल्या व १लीतील मुलांचे स्वागत करण्यात आले तसेच आज कृषी महाविद्यालय फलटण मधील कृषीकन्यांनी त्यामध्ये सहभाग दाखवला. त्यांनी त्यामध्ये शिक्षणाचे महत्त्व सांगितले त्याचबरोबर पुष्प व खाऊ वाटप  केली तसेच शाळेतील वर्गांची सजावट केली .मुलांना शिक्षण हे ओझं वाटू नये ,हसत खेळत त्यांनी शिकावे, त्यांना शाळेची ओढ लागावी, अशी कार्यक्रमाची भूमिका होती .या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सरपंच सौ.पौर्णिमा काटे , उपसरपंच अनुराज नलावडे, मुख्याध्यापक गायकवाड , सर्व शिक्षक उपस्थित होते 


तसेच कृषीकन्या अश्विनी महानवर, पायल नाळे,वैष्णवी चांदगुडे , निधी कोडपे, आविष्का शिंदे, प्रचिती कुदळे, सेजल दांगट यांनी हा कार्यक्रम राबवला .या कार्यक्रमा साठी 

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नीतिषा पंडित, प्रा. सुरेश साळुंखे, यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.