Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दालवडी येथे कृषी ॲपबाबत कृषीदूतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 


फलटण चौफेर दि १४ जून २०२५

फलटण तालुक्यातील दालवडी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प कार्यक्रमांतर्गत कृषीविषयक अॅप्लिकेशन्सबाबत प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्याना मार्गदर्शन केले आहे.


यावेळी कृषिदुत आदर्श पाटिल ,विनायक कांबळे ,सुशांत भोसले, प्रतीक सुर्वे ,अभिजीत यादव , ओंकार साळुंखे, आदित्य पवार यांनी ई-नाम, आयसीएआर अॅप कृषिक, एमएसएएमबी अॅप, अॅग्रॉस्टार आदी मोबाइलमधील शेतीविषयक अॅप्लिकेशन्सची ओळख शेतकऱ्यांना ओळख करून दिली तसेच याबाबत मार्गदर्शन केले. या अॅपद्वारे पिक लागवड, बाजारभाव, हवामान अंदाज, पूरक बियाणे, कीटकनाशके व खते बाजारभाव, प्रगतशील शेतीची माहिती मिळून शेतीचे अर्थनियोजन करण्यासाठी कशी मदत होते याविषयी माहिती दिली.


कृषिमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे, प्रा. नीतिषा पंडित, यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.