Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वेळोशी, परिसरात कृषीदूतांकडून विकसित कृषी संकल्प अभियान संपन्न

 


फलटण चौफेर दि १३ जून २०२५

महात्मा फुले कृषी विद्‌यापीठ संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय फलटण येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून वेळोशी परिसरात कृषी संकल्प अभियान राबविण्यात आले. विकसित कृषी अभियान - २०२५ हे भारतीय कृषी अनुसंधान परिषद व कृषी मंत्रालय यांच्या मार्फत राबविण्यात येत आहे. त्यानुसार कृषीदुत  शिंदे रोहित, शिंदे आदित्य ,चव्हाण अविनाश, शिंदे समाधान, चैतन्य बोडरे , पवार रोहन, दयासागर पाटील यांनी शेतकऱ्यांना आधुनिक व विकसित कृषी तंत्रज्ञान तसेच केंद्र व राज्य सरकार मार्फत  राबविण्यात येणऱ्या योजनांची माहिती दिली. या मध्ये गाय गोठा अनुदान योजना, कांदा चाळ योजना, मागेल त्याला शेत तळे योजना , सौर कृषी-पंप योजना इत्यादी योजनांची माहीती दिली.यासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु.डी.चव्हाण , उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. सौ. एन.एस धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. श्री. एस. एम. साळुंखे व प्रा. सौ.एन. ए .पंडीत यांनी मार्गदर्शन केले .

या वेळी सरपंच श्री. चंद्रकांत जाधव, पोलिस पाटील सौ. सुवर्णा लवंगरे, तलाठी सौ. अश्विनी खडके, विकास जगताप, रोहीदास रोमण, सुजित बागल , संजय कणसे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.