Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्याल्याचा उद्यानकन्या निरगुडीत दाखल

  


फलटण चौफेर दि १३ जून २०२५

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण येथील सातव्या सत्रातील उद्यानकन्या प्रशिक्षणासाठी निरगुडी ता.फलटण जि. सातारा येथे दाखल झाल्या असुन निरगुडी ग्रामपंचायत येथे सरपंच, उपसरपंच, सहाय्यक कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व ग्रामस्थांनी या उद्यानकन्या विद्यार्थिनींचे उत्स्फुर्त स्वागत केले.



ग्रामीण उद्यानविदया कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सुमारे २० आठवडे येथे वास्तव्यास राहणार असलेल्या या विद्यार्थीनी शेतकऱ्यांना शेतिविषयक माहिती, नवीन तंत्रज्ञान याबाबत माहिती देऊन गावामध्ये शेतिविषयक विविध उपक्रम व कार्यक्रम राबविणार आहेत. माती परीक्षण, फळबाग लागवड, एकात्मिक कीड रोग, बीज प्रक्रिया, आधुनिक शेती औजारांचे वापर, शेतीचा आर्थिक फायदा, जनावरांचे लसीकरण, आदीबाबत उपस्थित गावकरी व शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे या उद्यानकन्यांनी सांगितले. उद्यानविद्या विषयक जनजागृती करण्यास उद्यानविदया कार्यानुभव यांचा अभ्यास उद्यानकन्या करणार आहेत. तांबोळी बुशरा, वाघ अनुराधा, निकाळजे संजना, कारंडे शिवांजली, शिंदे साक्षी, या उद्यानकन्या येथे दाखल झाल्या आहेत. त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सरपंच मा. सौ. कोमल सस्ते, उपसरपंच सारिका बनसोडे,सहाय्यक कृषी अधिकारी संजय गायकवाड, ग्रामसेवक एन एस कदम, तलाठी अश्विनी गायकवाड  आणि ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ यांनी यावेळी दिले.

उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी प्रा. जे व्ही. लेंभे व प्रा. ए. डी. पाटील, प्रा.ए.आर.पाटील यांचे मार्गदर्शन या विद्यार्थिनींना लाभणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.