Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विकसित कृषी संकल्प अभियान योजनेमध्ये कृषी कन्यांचा सहभाग

 


फलटण चौफेर दि १३ जून २०२५ : चौधरवाडी फलटण येथे कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थीनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाल्या आहेत. गुरुवार दि. १२जून रोजी विकसित कृषी संकल्पना योजना राबवण्यात आली. हा कार्यक्रम कृषी सहाय्यिका सौ. तृप्ती सुभाष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. शेती आणि शेतकरी हा देशाच्या समृद्धीचा प्रमुख आधार आहे. आपल्या कृषी शास्त्रज्ञांनी अनेक संशोधने केली आहेत. कृषी शास्त्रज्ञ ,नवीन तंत्रज्ञान, प्रगत बियाणे, खते इत्यादींच्या मदतीने कमी खर्चात पीक उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. आपल्या शास्त्रज्ञांचे संशोधन प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना हवामान बदलाचे परिणाम, मातीतील पोषक तत्त्वे, खतांचे योग्य प्रमाण यासह शेतीच्या विविध पैलूंबद्दल जागरूक करणे आवश्यक आहे. या योजनेमुळे लॅब टू लँड माहिती पाठवणे सोपे झाले आहे. या योजनेमुळे प्रगतशील शेतकरी बनत आहेत. या कार्यक्रमांमध्ये  ग्रामस्थ ही उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कृषीकन्या कुमारी जाधव सृष्टी हनुमंत,लडकत श्रेया संजय, कांबळे प्रणोती सुनील, मलगुंडे प्रतीक्षा संजय, कदम रोहिणी लक्ष्मण, काटकर स्नेहा संजयकुमार, कांबळे सानिका अमोल या कृषी कन्या सहभागी झाल्या होत्या.या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण व उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे व प्रा. नितिशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.