फलटण चौफेर दि १७ मे २०२५
भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे आयपीएल लीग स्थगित केली गेली होती; पण आजपासून बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पुन्हा नव्या दमाने आयपीएल लीग खेळण्यासाठी सज्ज झाली आहे; रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्या लढतीने इंडियन प्रीमियर लीग २०२५ आजपासून पुन्हा सुरू होत आहे. पण आता प्ले ऑफच्या गणितांचीही जुळवाजुळव सुरू झाली आहे. सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे तीन संप प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झाले आहेत. परंतु ४ जागांसाठी ७ संघ अजूनही शर्यतीत आहेत.