Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

डॉ प्राजक्ता मेटकरी ( खरात) यांचा पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर गौरव पुरस्काराने गौरव

 




फलटण चौफेर दि १७ मे २०२५

फलटण -महात्मा फुले विचार अभियानाच्या वतीने  डॉक्टर प्राजक्ता मेटकरी खरात माती व पाणी परीक्षण तज्ञ यांना पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर  पुरस्कार २०२५ चा स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले फलटण येथील उपळेकर मंदिर येथे झालेल्या महात्मा फुले गुणगौरव कार्यक्रमध्ये, लेखक व साहित्यक  सर्जाकार सुरेश शिंदे,  क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले विचार मंच अध्यक्ष तुकाराम कोकाटे यांच्या उपस्थिती मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर  पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला 


यावेळी जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ,सामाजिक कार्यकर्ते संपतराव जाधव साहित्य  सर्जाकार सुरेश शिंदे, पुण्यश्लोक आईहिल्यादेवी  त्रीशताब्दी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बापूराव सूळ, सुजन फाउंडेशनचे अध्यक्ष अजित जाधव,या मान्यवराच्या उपस्थित देण्यात आला डॉक्टर प्राजक्ता मेटकरी खरात यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांना पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर   पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहेसन्मान युवा मनाचा  गौरव फुले विचारांचा या प्रमाणे काही कर्तुत्वान व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.