फलटण चौफेर दि २० मे २०२५
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी समाजाचे प्रभावशाली नेते छगन भुजबळ हे आज, मंगळवार २० मे २०२५ रोजी सकाळी मुंबईतील राजभवनात राज्य मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. महायुती सरकारच्या स्थापनेनंतर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. मात्र, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी मतदारांमध्ये प्रभाव वाढवण्यासाठी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येत आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.