फलटण चौफेर दि.२१ मे २०२५
नीरा खोऱ्यातील चार प्रमुख धरण परिसरात मागील चोवीस तासांत झालेल्या पावसाची नोंद आणि धरणातील पाणी साठ्याची माहिती खालीलप्रमाणे आहे:भाटघर धरण परिसरात 51 मिमी पावसाची नोंद झाली असून, सद्यस्थितीत धरणात 1.425 टीएमसी म्हणजेच 6 टक्के पाणीसाठा आहे.निरा देवघर धरणात 13 मिमी पाऊस झाला असून, 1.485 टीएमसी म्हणजेच 12.66टक्के पाणीसाठा आहे. येथे 750 क्युसेकने पाणीपुरवठा सुरु आहे.
वीर धरणात 19 मिमी पावसाची नोंद झाली असून, सध्या 3.444 टीएमसी म्हणजेच 36.61 टक्के पाणीसाठा आहे.गुंजवणी धरणात 90 मिमी जोरदार पावसाची नोंद झाली असून, साठा 0.744 टीएमसी म्हणजेच 20.17 टक्के इतका आहे.एकूण चारही धरणांतील साठा 7.100 टीएमसी 14.69 टक्के झाला असून, यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत 4 टक्के अधिक पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच दिवशी साठा केवळ 4.918 टीएमसी 10.18 टक्के होता.सद्यस्थितीत एकूण पाणीसंचयात 2.182 टीएमसीने वाढ झालेली असून, सर्व धरणांमध्ये पाण्याची आवक झाली नाही.नीरा डाव्या कालव्यातून 827व नीरा उजवा कालव्यातून 1500 क्यूसेक पाणी व्यवस्थापन सुरु असून सध्या तरी पावसाचा जोर काहीसा वाढल्याचे चित्र आहे, मात्र पावसाची सततता आणि जुलैपूर्वी होणारा पर्जन्यमान महत्त्वाचा ठरणार आहे. जलसाठ्याच्या स्थितीवर प्रशासन सतत लक्ष ठेवून आहे.