फलटण चौफेर दि २५ एप्रिल २०२५
ठाकूरकी, ता फलटण येथे खरीप पूर्व हंगाम शेतकरी मेळावा संपन्न झाला कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी सहायिका आशा बोराटे यांनी केले या कार्यक्रमांमध्ये सेंद्रिय शेती खरीप हंगामाला सामोरे जाताना घ्यावयाची काळजी, बियाण्याची निवड, बीज प्रक्रिया, घरच्या घरी सेंद्रिय शेतीची कृषी निविष्ठा तयार करणे या विषयावर कृषी सहाय्यक अरविंद नाळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले . राजेंद्र पालवे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना या विषयावर मार्गदर्शन केले दत्तात्रय राऊत कृषी पर्यवेक्षक यांनी शेती विषयक समस्या जाणून घेऊन त्याची योग्य सोडवनुक करावयाच्या उपायोजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला स्वावलंबी बचत गट फरांदवाडी अध्यक्षा अमोलिका अरविंद शिंदे, यशोदा महिला बचत गट अध्यक्ष कल्याणी प्रदीप शिंदे, कृषीसखी -मयुरी योगेश घनवट, प्रगतिशील शेतकरी भरत शिंदे ,दिलीप शिंदे ,योगेश घनवट, अमृत शिंदे इत्यादी शेतकरी व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या