फलटण चौफेर दि २४ एप्रिल २०२५- विडणी गावचे युवा लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची महाराष्ट्र प्रधान मुखिया सरपंच संघाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.राष्ट्रीय प्रधान मुखिया सरपंच संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ठाकूर चंदनसिंह यांच्यावतीने विडणी ता.फलटण गावचे लोकनियुक्त सरपंच सागर कांतीलाल अभंग यांना महाराष्ट्र राज्य मुखिया सरपंच संघाच्या उपाध्यक्षपदी करण्यात आलेल्या निवडीचे पत्र देण्यात आले आहे गेल्या सुमारे अडीच वर्षात सरपंच सागर अभंग यांनी विडणी गावाचा कायापालट केला असून त्यांनी गावाच्या विकासासाठी व लोकांसाठी अनेक शासकीय योजना राबविल्या असून गावात करोडो रुपयांची विकासकामे केली आहेत,त्यांच्या या कामांची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत त्यांची आता महाराष्ट्र प्रधान मुखिया सरपंच संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली असून त्यांच्या या निवडीबदल मा.खा. रणजितसिंह निंबाळकर, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,आमदार सचिन पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व विडणी ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.