फलटण चौफेर दि २५ एप्रिल २०२५
सुरवडी तालुका फलटण येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन यात्रा कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे सुरवडी गावचे ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा दि २०एप्रिल पासून सुरू झाली असून आज दि २५ रोजी श्रींचा छबीना रात्री ९.३० ते पहाटे ३ या वेळेत होणार आहे शनिवार दिनांक २६ रोजी 'गीतांजली सातारकर' यांचा लोकनाट्य तमाशा सकाळी १० ते २.३० पर्यंत आयोजित करण्यात आला असून सायंकाळी ४.३० वाजता जिल्हा परिषद शाळा सुरवडी याठिकाणी नामांकित मल्लांच्या जंगी कुस्त्यां होणार आहेत रात्री ९.३० वाजता 'तुमच्यासाठी कायपण' हा ऑर्केस्ट्रा न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रारंगणात होणार आहे रविवार दिनांक २७ फक्त महिलांसाठी महाराष्ट्राचा मराठी बाणा हा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेच्या प्रारंगणात होणार आहे सोमवार दि २८ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता 'बारा गावच्या बारा अप्सरा'हा लोकप्रिय लावण्यांचा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रारंगणात आयोजित केला असल्याचे आयोजक समस्त ग्रामस्थ व यात्रा कमिटी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.