फलटण चौफेर दि २८ मार्च २०२५
लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील सातत्याने गुन्हे करणाऱ्या सराईत तिघांना सातारा पोलीस अधीक्षकांनी २ वर्षाकरिता सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यामधून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे तडीपार केलेल्यांमध्ये विकी ऊर्फ बाळु बापुराव खताळ, वय २३ वर्षे, ,शुभम ऊर्फ सोनु आप्पासो घुले, वय २३ वर्षे व सुयोग हिंदुराव खताळ, वय २७वर्षे तिघेही रा कापडगांव ता फलटण जि सातारा यांचा समावेश आहे यांच्या विरोधात लोणंद पोलीस स्थानकात दुखापत करणे,शिवीगाळ, दमदाटी करणे, चोरी करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने लोणंद पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपूर्ण सातारा तसेच पुणे, सोलापुर जिल्हा हद्दीतुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताय हद्दपार प्राधिकरण तथ पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी राहुल आर धस, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग फलटण यांनी केली होती सराईतांवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुन ही त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. या टोळीमधील इसम हे लोणंद तसेच परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती त्यामुळे पोलिस प्रमुख समीर शेख यांनी तिघांना संपूर्ण सातारा तसेच पुणे, सोलापुर जिल्हा हद्दीतून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.