साखरवाडी पुढारी वृत्तसेवा
आधुनिक तंत्रज्ञान व व्यवस्थापन यांचा वापर केल्यास ऊस शेतीमध्ये एकरी शंभर टना पेक्षा अधिक उत्पादन घेणे सहज शक्य असल्याचे प्रतिपादन ऊस शेती तज्ञ व गन्ना मास्टर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक डॉ अंकुश चोरमुले यांनी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा सातारा व फलटण तालुका कृषी विभागाच्या वतीने अलगुडेवाडी ता फलटण येथील अभीराम मंगल कार्यालय येथे आयोजित ऊस व्यवस्थापन कार्यशाळेत केले यावेळी प्रकल्प संचालक आत्मा सातारा अजय शेंडे,उपविभागीय कृषी अधिकारी फलटण श्री खालीद मोमीन,तालुका कृषी अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड,फलटण कृषि कार्यालयातील सर्व मंडळ कृषी अधिकारी,कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक,आत्मा BTM व तालुक्यातील बहुसंख्य प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते
डॉ. अंकुश चोरमुले म्हणाले,शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया,लागवड व्यवस्थापन, आधुनिक ऊसाच्या जातीचा वापर, पाणी व तण व्यवस्थापन, सेंद्रिय व रासायनिक खत यांचा माती परीक्षणानुसार वापर,पाचट व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान व व्यवस्थापन यांचा वापर केल्यास एकरी १०० टना पेक्षा अधिक उत्पादन घेणे सहज शक्य आहे. या कार्यशाळेत सल्फर मिल्स लिमिटेडचे मॅनेजर वशिष्ठ घुले यांनी उसामध्ये रासायनिक खताचा वापर या विषयी शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले.