Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुरूमचे ग्रामसेवक अखेर निलंबित; कामात अनियमितता व गैरप्रकार केल्याचा ठपका!

 


फलटण चौफेर दि २९ मार्च २०२५

मुरूम तालुका फलटण गावचे ग्रामसेवक संतोष उत्तम धायगुडे यांना ग्रामपंचायत कामकाजामध्ये प्रशासकीय व आर्थिक अनियमितता तसेच बनावट कागदपत्रांचा वापर करून मतदार यादीतील खोट्यासह्याने द्वारे नावे कमी करण्याचा गैरप्रकार केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या  कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी   निलंबित केले आहे याबाबत निलंबन आदेशात म्हटले आहे की, संतोष उत्तम धायगुडे हे ग्रामसेवक ग्रामपंचायत मुरुम येथे कार्यरत असताना त्यांनी ग्रामपंचायत कामकाजामध्ये प्रशासकीय व आर्थिक अनियमितता केलेली निदर्शनास आलेली आहे. धायगुडे यांनी ग्रामपंचायत अभिलेखे अपुर्ण ठेवून आर्थिक व दप्तरी कामकाजात अनिमियतता केलेली आहे.बनावट कागदपत्रांचा वापर करुन मतदार यादीतील खोटया सह्या करुन नावे कमी करणेचा गैरप्रकार केलेला आहे. धायगुडे यांनी लेखा परिक्षणास दप्तर न दाखविले संदर्भात त्यांना दंडाचे कारवाईबाबत दिनांक २१ नोव्हेंबर २०२३ रोजी  कारणे दाखवा नोटीसही देणेत आलेली आहे. या सर्व बाबींमध्ये धायगुडे यांनी कर्तव्यात कसुर केलेली असून, महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग केला आहे. तसेच त्यांनी आर्थिक व प्रशासकीय अनियमितता केलेचे व त्यामुळे मुरुम ग्रामपंचायतींचे नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आलेले आहे. सबब धायगुडे यांचेवरील चौकशी पूर्ण करणेसाठी व चौकशीमध्ये अडथळा निर्माण होऊ नये याकरिता संतोष संतोष उत्तम धायगुडे, ग्रामसेवक यांना पदावरुन तात्पुरते दुर करणे आवश्यक वाटत असल्याचे निलंबन आदेशात म्हटले आहे


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.