फलटण चौफेर दि ०९ फेब्रुवारी
विडणी येथे श्री.खंडोबा मंदिर कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. विडणी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या श्री. खंडोबा मंदिराचे कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा आज रविवार दि.९ रोजी कार्यक्रम होणार असून यामध्ये आज ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत कलशाची सवाद्य भव्य नगरप्रदक्षिणेचा कार्यक्रम होणार आहे सोमवार दि.१० रोजी सकाळी ७.३० ते ९ गणपती पूजन व पुण्याहवाचनाचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर ९ ते ११ ब्रम्हादि मंडळ व नवग्रह देवता स्थापना होणार आहे ११ ते १ होमहवन व मूर्तीअभिषेक त्यानंतर १.२२ वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर कळस स्थापना व नैवेद्य तसेच आरतीचा कार्यक्रम होणार आहे व शेवटी दुपारी २ वाजल्यापासून रात्री १० पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून ग्रामस्थ व भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.