फलटण चौफेर दि १० फेब्रुवारी २०२५
साखरवाडी ता फलटण गावातील सर्व सामान्य कुटुंबातील खो- खो च्या राष्ट्रीय खेळाडू करिश्मा रफिक नगारजी व खुशबू रफिक नगारजी या दोघी सख्या बहिणींची नुकत्याच झालेल्या मुंबई पोलिस दलातील भरतीत निवड झाली आहे.सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या करिश्मा व खुशबू या दोघी बहिणींचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे साखरवाडी विद्यालयाच्या प्राथमिक व माध्यमिक विभागात झाले दोघींनाही खेळाची आवड असत्याने त्या दोघीही खो-खो च्या उत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू देखील आहेत. ११, १२ वी तसेच बी ए सी यी पर्यंतचे पदवीचे शिक्षण फलटण मधील मुधोजी महाविद्यालयामध्ये झाले.एम ए(इंग्रजी) चे शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक मधून पूर्ण केले आहे दोघींचेही B.P.Ed. ची पदवी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,(छ. संभाजीनगर) येथून पूर्ण केले. १२ जनिवारी रोजी झालेल्या महाराष्ट्र, मुंबई पोलिस भरती परीक्षेचा नुकताच निकाल लागलेला असून या दोघी बहिणींची महाराष्ट्र, मुंबई पोलिस दलात निवड झाली असून त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांबा वर्षाव होत आहे.