फलटण चौफेर दि ११ फेब्रुवारी २०२५
साखरवाडी ता फलटण येथे बुद्ध विहारासाठी शासकीय जागा मिळावी या मागणीसाठी शेकडो भीमसैनिकांनी सोमवारी फलटण तहसील कार्यालयावर भव्य लॉंगमार्च काढला.यावेळी जागा मिळण्याबाबत प्रशासनाने समाजाच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले असले तरी जागेबाबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.फलटण तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू झाले असून, जोपर्यंत बुद्ध विहारासाठी निश्चित जागेबाबत लेखी पत्र मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा ठाम निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. फक्त तोंडी आश्वासन नको, तर जागेबाबत प्रशासनाने अधिकृत लेखी पत्र द्यावे, अन्यथा ठिय्या आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे