Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण तालुक्यातील ट्रान्सफार्मर चोरीबाबत तालुकास्तरीय बैठक घ्यावी-प्रजा गटाची शेतकऱ्यांसह प्रांताधिकार्‍यांकडे मागणी

 


फलटण चौफेर दि ११ फेब्रुवारी २०२५

फलटण तालुक्यात सातत्याने होणाऱ्या ट्रान्सफॉर्मर चोरीबाबत तालुकास्तरीय बैठक घेण्याचे मागणी करणारे निवेदन प्रजा गटाने शेतकऱ्यांसह प्रांताधिकाऱ्यांना  दिले आहे यामध्ये म्हटले आहे की,  मागील बऱ्याच दिवसांपासून फलटण तालुक्यात ट्रांसफार्मर चोरीच्या घटना घडल्या आहेत महावितरण पोलीस स्टेशनकडे याबाबत सतत  तक्रार करून ट्रांसफार्मर चोरी झाल्याबाबत अज्ञातावर गुन्हा दाखल होत आहे परंतु ज्या ठिकाणी डीपी चोरीला जातो, त्या ठिकाणी दोन ते तीन महिने फलटण तालुका वीज महावितरण शेतकऱ्यांना बदली डीपी जोडून देत नाही. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वास्तविक पाहता शासन नियमानुसार डीपी चोरीला गेला अथवा नादुरुस्त झाला तर तो शेतकऱ्यांना दोन दिवसांच्या आतमध्ये वीज महावितरणने जोडून देणे बंधनकारक आहे. परंतु फलटण वीज महावितरण महाराष्ट्र सरकारच्या नियमाला केराची टोपली दाखवत वारंवार कायद्याची पायमल्ली करत आहे

पोलीस प्रशासनाने डीपी चोरी कायमची थांबवावी व डीपी चोरीला गेला अथवा नादुरुस्त झाल्यास वीज महावितरणने शेतकऱ्यांना दोन दिवसात डीपी उपलब्ध करून देणे, या दोन विषयांबाबत फलटणचे नवनिर्वाचित प्रांताधिकारी विकास व्यवहारे यांना समक्ष भेटून प्रजा गटाच्यावतीने शेतकऱ्यांसह पुन्हा एकदा पोलीस प्रशासन व वीज महावितरण प्रशासन यांचेसह तालुकास्तरीय बैठक घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याचे प्रजा गटाचे प्रमुख प्रदीप झणझणे यांनी सांगितले. तसेच सातारा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व वीज महावितरणचे अधीक्षक यांच्याशी पत्रव्यवहार करून ट्रान्सफार्मर बाबत शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून द्यावा, अशी फलटण प्रांताधिकारी यांचेकडे मागणी करण्यात आली. यावर फलटण प्रांताधिकारी यांनी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे  आश्वासन दिले असल्याचे त्यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.