फलटण चौफेर दि. ११ फेब्रुवारी २०२५ फलटण उपविभागीय अधिकारी म्हणून विकास व्यवहारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मागील काही दिवसांपूर्वी फलटण प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या बदली नंतर हे पद रिक्त होते. विकास व्यवहारे हे मूळचे इंदापूर तालुक्यातील पिंपरी या गावचे रहिवाशी आहेत त्यांनी या आधी माळशिरस येथे अप्पर तहसीलदार म्हणून काम पाहिले आहे त्यांचे फलटण कार्यालयात नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, तुषार देशमुख व तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले