फलटण चौफेर दि १२ फेब्रुवारी २०२५
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटण येथील बी.टेक. (कंप्युटर अभियांत्रिकी) शाखेतील विद्यार्थी संकेत पवार याने राष्ट्रीय स्तरावर आपली चमकदार कामगिरी सिद्ध केली आहे. तो नोव्हार्टिस फार्मास्युटिकल कंपनीतर्फे आयोजित NEST (Nurturing Excellence, Strengthening Talent) स्पर्धेच्या ग्रँड फायनलमध्ये पोहोचला आहे.ही स्पर्धा संपूर्ण भारतभरातील विद्यार्थ्यांसाठी खुली होती. संकेत पवारने पहिल्या दोन फेऱ्या यशस्वीपणे पार करून अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. या स्पर्धेत त्याचे प्रतिस्पर्धी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc), बेंगळुरू आणि BITS स्कूल ऑफ मॅनेजमेंट, मुंबई येथील विद्यार्थी आहेत. अंतिम फेरीत ₹१.५ लाख व ₹७५,००० अशी महत्त्वपूर्ण पारितोषिके देण्यात येणार आहेत.संकेतच्या या उल्लेखनीय यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, नियामक मंडळाचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र नार्वे यांनी त्याचे हार्दिक अभिनंदन केले व ग्रँड फायनलसाठी शुभेच्छा दिल्या.संकेत पवारच्या या यशाने फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल झाले असून, स्पर्धेतील त्याच्या अंतिम फेरीतील कामगिरीबाबत उत्सुकता आहे. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल संपूर्ण महाविद्यालय, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी परिवाराकडून त्याला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!