फलटण चौफेर दि १२ फेब्रुवारी २०२५
फलटण तालुक्यात मंगळवार दि ११ फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या बारावीच्या आणि दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १२ केंद्र आहेत कॉपी मुक्त परीक्षा होण्यासाठी ३ भरारी पथकासह १२ बैठे पथके सज्ज केली असल्याची माहिती तहसिलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली बारावीच्या पहिल्या इंग्रजी पेपरच्या परीक्षेवेळी सर्व भरारी पथकांनी परीक्षा केंद्रांना अचानक भेटी दिल्या असून सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत सुरु झाल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी सातारा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा यांनी दिनांक ११ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन सर्वांना आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार फलटणचे नवनियुक्त प्रांताधिकारी विकास व्यवहारे यांचे नियोजन आणि कुशल मार्गदर्शनाखाली फलटण तालुका महसूल पोलिस, ग्रामविकास आणि शिक्षण विभाग कॉपी मुक्त परीक्षांसाठी एकत्रित कामकाज करत असल्याचे त्यांनी सांगितले.