फलटण चौफेर दि ११ फेब्रुवारी २०२५
विडणी येथे श्री खंडोबा मंदिर कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. विडणी ता. फलटण येथे नव्याने बांधण्यात आलेला श्री खंडोबा मंदिराचे कलशारोहन व मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला यावेळी रविवार दिनांक ९ रोजी सायंकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत कलशाची व मूर्तींची गावातून सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यातआली त्यानंतर सोमवार दिनांक १० रोजी सकाळी साडेदहा ते नऊ वाजता गणपती पूजन व पुण्याहवानाचा कार्यक्रम संपन्न झाला, ब्रह्मादी मंडळ व नवग्रह देवता स्थापन करण्यात आली, सकाळी ११ ते १ या वेळेत व मूर्ती अभिषेक त्यानंतर मूर्ती प्राणप्रतिष्णाचा कार्यक्रम संपन्न होऊन त्यानंतर मंदिरावर कळस स्थापन करण्यात आला तसेच आरतीचा व नैवेद्याचा कार्यक्रम होऊन दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत भव्य असे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या धार्मिक कार्यक्रमास विडणी व परिसरातील सर्व भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते , राजे उमाजी नाईक तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व भाविकांनी हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला.