Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लोणंद शहरातील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा



फलटण चौफेर दि १२ फेब्रुवारी २०२५

प्रशासनाकडून दोन दिवसांपासून लोणंद शहरातील लोणंद-सातारा, लोणंद-शिरवळ, लोणंद-खंडाळा या रस्त्यावरील अतिक्रमण तसेच शासकीय व नगरपंचायत जागेवरील अतिक्रमणांवर  हातोडा मारण्यात आला. पोलिस बंदोबस्तात सुमारे ३०० हून अधिक अतिक्रमणे दोन दिवसात हटवण्यात आली. आहेत यामुळे वारंवार वाहतुकीची प्रचंड कोंडी होणाऱ्या लोणंद शहरातील प्रमुख रस्ते व चौकांनी आता मोकळा श्वास घेतला आहे लोणंद नगरपंचायत, महसूल प्रशासन, एनएचआय, पीडब्ल्यूडी, पोलिस स्टेशन या विभागांनी संयुक्तपण अतिक्रमण हटाव मोहीम राबवली.  दोन जेसीबी, ट्रॅक्टर, डंपर यांच्या फौज फाट्यासह प्रशासन दाखल झाले लोणंद-खंडाळा रस्त्यावरील तसेच बाजार तळावरील अतिक्रमणे केलेल्या टपरी, खोके आदी अतिक्रमणे जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी लोणंद नगरपांचायतीचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड व त्यांचा सर्व स्टाफ, नायब तहसीलदार योगेश चंदनशिवे, लोणंदचे सपोनि सुशील भोसले, भूमी संपादन समन्वयक अधिकारी लक्ष्मण पाटील, एनएचआयचे टेक्निकल मॅनेजर पंकज प्रसाद,पीडब्ल्यूडीचे शाखा अभियंता पी. डी. मस्तुद, तलाठी शशिकांत वणवे आदी सहभागी झाले होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.