फलटण चौफेर दि ११ फेब्रुवारी २०२५
फलटण बस आगारामध्ये नवीन १० डिझेल बस दाखल होणार असून पहिल्या टप्प्यातील १० बस पैकी दिनांक १३ फेब्रुवारी रोजी ७ बस दाखल होणार असून उर्वरित ३ बस १५ फेब्रुवारी रोजी दाखल होणार असल्याची माहिती फलटण आगार प्रमुख राहुल वाघमोडे यांनी दिली दरम्यान फलटण आगारांमध्ये अपुऱ्या बसमुळे होणाऱ्या गैरसोयीची प्रवाशी वर्गामधून वारंवार मागणी होत होती याबाबत फलटण कोरेगावचे आमदार सचिन पाटील व माजी खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता त्याला आता यश आले असून फलटण आगारात लवकरच दहा नवीन बस दाखल होणार आहेत यामुळे प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे