फलटण चौफेर दि १० फेब्रुवारी २०२५
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत शिक्षण विभाग अधिकारी गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, फलटण येथे अधिव्याख्याता पदावर कार्यरत असणारे कृष्णा फडतरे यांना मिळाला असून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे. हे दरवर्षी राज्यातील पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांचे तसेच शिक्षण विभागात कार्यरत अधिकाऱ्यांसाठी नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सदर स्पर्धेत नावीन्यपूर्ण व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचा समावेश असतो. सदर स्पर्धेचे मूल्यांकन जिल्हा ,विभाग व राज्यस्तर या टप्प्यांवर होत असते.अधिकारी गटातून कृष्णा फडतरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२९ मधील 6C व कोडींग कौशल्य विकसनातून शिक्षक सक्षमीकरण या विषयावर नवोपक्रम सादर केला होता.
या उपक्रमाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात २ हजार पेक्षा अधिक शिक्षकांना कोडींग प्रशिक्षण देता आले.हजारो पेक्षा जास्त कोडींगवर आधारित व्हिडिओ व स्क्रॅच प्रोजेक्ट तयार झाले आहेत. जिल्ह्यात कोडींग शिक्षणाची चळवळ उभी झाली. उत्कृष्ट ५० शिक्षकांना सामाजिक संस्थांच्या सहकार्याने १० संगणक असणाऱ्या ५० लॅब ,५ टॅब व लॅपटॉप अशी ६० ते ७० लाखांची बक्षीसे शिक्षकांना मिळवून देता आली.
सदर नवोपक्रमामुळे जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये डिजिटल साक्षरता, आधुनिक तंत्रज्ञानाचा शाळांमधे उपयोग. कोडींग व संगणकीय मूलभूत कौशल्य शिक्षकांमध्ये विकसित होण्यासाठी मोलाची मदत झाली. व जिल्ह्यात तंत्रज्ञानाची चळवळ उभी राहिली. ह्या नवोपक्रमामुळे नवीन अभ्यासक्रमात समाविष्ट होणारे कोडींग सारखे विषयावर शिक्षक आधीच प्रशिक्षित झाले आहे. ह्या उल्लेखनीय कामकाजाची दखल राज्याची शिक्षण विभागाची मुख्य संस्था राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी दखल घेवून त्यांना राज्यात अधिकारी गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषक देण्यात आले.नवोपक्रमाचे मूल्यांकन डॉ. मंगेश घोगरे साहेब प्राचार्य,DIET वर्धा व YCMOU विद्यापीठातील शिक्षण विभागाच्या विभागप्रमुख डॉ.संजीवनी महाले मॅडम, टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉ. माधुरी इसावे मॅडम यांनी केले.सदर पुरस्कार श्री.राहुल रेखावार साहेब संचालक, SCERT पुणे.श्रीम.अनुराधा ओक, सहसंचालक-SCERT पुणे.,डॉ.कमलादेवी आवटे मॅडम व श्रीम. माधुरी सावरकर मॅडम उपसंचालक, SCERT तसेच SCERT मधील वर्ग १ व वर्ग २ च्या अधिकारी वर्गांच्या उपस्थित सदर पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला.