प्रतिनिधी शिवाजी भोसले
फलटण तालुक्यातील डीपी चोरीच सत्र सुरूच असून चोरट्यांनी एकाच रात्री होळ व खराडेवाडी गावातील तीन डीपी फोडून त्यामधील तांब्याच्या तारेची चोरी केल्याची घटना घडली आहे खराडेवाडी ता फलटण येथून सह्याद्री डीपी व होळगावातील आसामी परिसरातील शंभर एच पी क्षमतेचे दोन डीपी चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन फोडण्याची घटना घडली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी खराडेवाडी हद्दीतील सह्याद्री डीपी येथील १०० एचपी क्षमतेचा व होळ येथील २ असे एकूण तीन डीपी एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे सध्या पावसाने उघडीप दिल्याने उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग आडसाली उसाची लागण, बाजरी, सोयाबीन, कांदा व इतर पिकांना पाणी देण्यासाठी कृषी पंपाचा वापर करत आहे मात्र डीपी चोरी झाल्याने शेतकऱ्यांपुढे आता नवीनच संकट उभे राहिले आहे मागील पंधरा दिवसात फलटण तालुक्यातील तब्बल आठ डीपी चोरी झाल्याने चोरटे एक प्रकारे फलटण पोलिसांना आव्हान देत नाहीत ना? अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे