फलटण चौफेर दि ५
होळ विकास सोसायटीचे माजी चेअरमन पांडुरंग जगन्नाथ भोसले व न्यू फलटण शुगर वर्क्स लिमिटेडचे माजी चेअरमन, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती दिवंगत कै विष्णुपंत गाडे यांचे चिरंजीव राजेंद्र गाडे यांनी विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी राजे गटामध्ये जाहीर प्रवेश केला
साखरवाडी येथील पांडुरंग भोसले यांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजे गटात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते हार व पुष्पगुच्छ स्वीकारून जाहीर प्रवेश केला यावेळी वाईचे माजी सभापती शशिकांत मिसाळ, जिंतीचे गावचे माजी सरपंच गोकुळ तात्या रुपनवर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, माजी सदस्य किरण साळुंखे पाटील, सातारा जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक अंकुश साळुंखे पाटील, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले, सेक्रेटरी राजेंद्र भोसले, पोपट भोसले,खजिनदार गोरख भोसले संतोष भोसले, महेश भोसले, मच्छिंद्र भोसले, शरदराव जाधव, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन शाहूराजे भोसले, मातोश्री कंट्रक्शनचे संजय भोसले, विनोद जाधव,के के भोसले, बापूराव भोसले,माऊली भोसले यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस राजे गटाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते