फलटण चौफेर दि ४
दोन दिवसांपूर्वी सुरवडीहून साखरवाडी कडे जाताना नीरा उजवा कालव्या वरील पुलावरून कालव्याच्या पाण्यात गाडी क्रमांक एम एच १२ टी व्ही ६१९७ ही पाण्यात पडली होती यावेळी सुरवडीचे ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव व अभिजित खोमणे रा १५ नंबर फाटा यांच्या ही गोष्ट लक्षात आली .त्यांनी जीवाची परवा न करता त्या दोघींना कॅनॉलच्या पाण्याच्या बाहेर गाडीचे दरवाजे फोडून काढले. आणि त्या दोघींचा जीव वाचवला खरंतर वेळ रात्रीची असल्यामुळे केवळ त्यांचं नशीब बलवत्तर म्हणून परमेश्वर रूपात हे दोघे त्या महिलांचा जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणी हजर झाले त्यांनी कुठल्याही प्रकारची बघायची भूमिका न घेता जीवावर उदार होऊन त्यांचे प्राण वाचवले या दोन्ही युवकांचा सत्कार करावा असे माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम यांनी व पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशाने साखरवाडी दुरुक्षेत्र या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर सहाय्यक पोलीस फौजदार पांडुरंग हजारे पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे सत्कार करण्यात आला