फलटण चौफेर दि १
आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर आयोजित जिल्हास्तरीय आई सन्मान पुरस्कार २०२४ व राज्यस्तरीय आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पाडला.
या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना श्रीमंत संजीव राजे यांनी वाचन प्रेरणा ही काळाची गरज आहे आणि वाचनातूनच आपला सांस्कृतिक ठेवा आपण जपला पाहिजे. सन २०१७ पासून गेली सात वर्ष आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर,विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, पुस्तक वाटप, वृक्ष लागवड. इत्यादी वेगवेगळे उपक्रम राबवितात. तसेच नव्याने राज्यस्तरीय आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी वेगवेगळी प्रेरणादायी पुस्तक वाचल्यानंतर त्यांच्या मनामध्येही चांगले विचारण्याची पेरण झालेली दिसून येते.
आमदार दीपकराव चव्हाण यांनीही आई प्रतिष्ठानचे अतिशय चांगली कार्य चालू आहे. आईच्या आठवणीत दोघे बंधू व तांबे परिवार सर्वांना प्रेरणा देण्याचे काम करत असतात.
ॲड.मधुबाला भोसले यांनी आई प्रतिष्ठानचे व वाचन प्रेरणा या नवीन उपक्रमाचे कौतुक केले. वाचनातून चांगले संस्कार व चांगले विचार करत असतात असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला वाठार गावच्या सरपंच सुवर्णा नाळे,उपसरपंच अमृत निंबाळकर, विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी विकास सुरेश शिंदे पत्रकार, अतुल जगन्नाथ कुंभार पोलीस,डॉ. किरण प्रदीप तारकर वैद्यकीय अधिकारी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय फलटण . उषा नाथबुवा तरटे अंगणवाडी सेविका, हरिदास सदाशिव जगदाळेवारकरी संप्रदाय, नागेश मधुकर पाठक प्राचार्य,सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण, समीर मोहन गावडे प्राचार्य, रॉयल इंग्लिश स्कूल जावली, प्रज्ञा अनंत काकडे मुख्याध्यापिका, स्वर्गीय शिलादेवी शरदकुमार दोशी प्राथमिक विद्यामंदिर कोळकी, जनार्दन शंकर पवार क्रीडाशिक्षक ,सर लष्कर श्रीमंत बाबाराजे खर्डेकर हनुमंतवाडी,प्रा.विजयकुमार मोतीराम निंबाळकर इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, श्री मारुतराव कृष्णाजी माने कनिष्ठ माध्यमिक विद्यालय देऊर, विद्या दिलीप शिंदे वरिष्ठ मुख्याध्यापिका, निंबळक ,अमोल शिवाजी माने प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी (कवठे) वाई,संजय धोंडीबा संकपाळ प्राथमिक शाळा वेंगळे वरचीवाडी महाबळेश्वर, नितीन आत्माराम जाधव पदवीधर शिक्षक प्राथमिक शाळा आलेवाडी तालुका जावली, राजेंद्र रघुनाथ बोबडे प्राथमिक शाळा कासानी ( पोस्ट रोहोट)तालुका सातारा,वर्षा विजय ससाणे( नेवसे)प्राथमिक शाळा कवठे खंडाळा,रामचंद्र पोपट घाडगे प्राथमिक शाळा कामठी पोपळकरवाडी खटाव,विद्या संतोष लेंभे प्राथमिक शाळा सोनके तालुका कोरेगाव,लीना शंकर वैद्य प्राथमिक शाळा पवारमळा (चरेगाव) कराड, मनोजकुमार मारुती कोरडे प्राथमिक शाळा बाजे मारुल तालुका पाटण, शुभांगी पंकज बोबडे प्राथमिक शाळा दरावस्ती( टाकेवाडी) तालुका माण,छाया शहाजी जाधव प्राथमिक शाळा फडतरवाडी ,विजयकुमार ज्ञानदेव नाळे प्राथमिक शाळा मांगोबामाळ निंबळक ,वैशाली हिम्मत जगताप प्राथमिक शाळा जननीमळा गिरवी, विकास बबन भुजबळ प्राथमिक शाळा सोमंथळी, तानाजी धोंडीराम कुलाळ प्राथमिक शाळा कुलाळवस्ती, शितल विजय रिटे प्राथमिक शाळा कोऱ्हाळे,
इ .जिल्हास्तरीय आई सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच राज्यस्तरीय आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा पुरस्कार १४ विद्यार्थ्यांना देण्यात आले. त्या सर्वांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. आई प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. गणेश तांबे यांनी केले.