फलटण चौफेर दि १ : फलटण तालुक्यातील डीपी चोरीचे सत्र सुरूच असून चौधरवाडी ता. फलटण येथील ट्रान्स्फॉर्मर तोडून त्यातील २०० लिटर ऑईल सांडून ट्रान्स्फॉर्मरमधील सुमारे १०० किलो वजनाची ५० हजार रुपये किंमतीची कॉपर वायर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली या घटनेची फिर्याद महेश प्रकाश काकडे (रा. लक्ष्मीनगर फलटण) यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात दिली असून पोलिस हवालदार नाना होले तपास करत आहेत.